Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
एसटी बसचे तिकीट बुक करणं झालं सोपं! IRCTC च्या वेबसाईटवरून करता येणार तिकीट बुक

ST Bus Reservation : एसटी महामंडळाने प्रवाशांना एक गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे. त्यामुळे आता IRCTC च्या वेबसाईटद्वारे एसटी बसचे तिकीट काढता येणार आहे.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आयुष्मान भव योजनेचा शुभारंभ
प्रवाशांना https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी IRCTC ने हा निर्णय घेतला आहे. तसेच IRCTC आणि एसटी महामंडळ यांच्यातील एकत्रीकरणामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.





