Monsoon Update : यंदाचा मान्सून लांबला! ४ ते ५ दिवस उशीर होणार
![This year's monsoon is long! There will be a delay of 4 to 5 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Monsoon-Update-780x470.jpg)
Monsoon Update : यंदाचा मान्सून लांबला आहे. केरळमध्ये पाऊस सुरु होण्याची तारीख लांबली आहे. भारतीय हवामान खात्याने आता मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ४ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण अद्याप केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतिक्षा लांबली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला असून केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे.
दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत आहे. ४ जून रोजी पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचली असून आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. पुढील तीन-चार दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडचं नाव जिजाऊनगर करा, भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/image-12.png)
केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात साधारणपणे १३ ते १५ जून दरम्यान पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व आणि ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतात ८७ सेंटीमीटरच्या सरासरीच्या ९४-१०६ टक्के सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.