breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडचं नाव जिजाऊनगर करा, भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मागणी

पिंपरी : काही दिवसांपुर्वी अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर असं होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान आता पिंपरी-चिंचवडचे नामांतरण जिजाऊ नगर करावं अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० व्या राज्यभिषेक दिनाच्या औचित्य साधून ही मागणी करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात भक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी-चिंचवडचे नाव बदलून जिजाऊ नगर करावं अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. शहरात जवळपास १०० अधिक ठिकाणी बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचा – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन

पिंपरी-चिंचवड शहराचं नाव बदलण्याच्या चर्चा या अगोदर २००६-०७ ला झाली होती. तशा दैनिकात बातम्या देखील छापून आल्या. पण, स्थानिकांनी पिंपरी-चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button