एका मराठमोळ्या महिलेला इजिप्तमध्ये शाहरुख खान मुळे असा झाला फायदा…
![This is how Shah Rukh Khan benefited a Marathi woman in Egypt](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/shahrukh-khan-fe.jpeg)
बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खान ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी सतत चर्चेत असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. याचे एक उदाहरण समोर आले आहे. एका महिलेला शाहरुख खानमुळे इजिप्तमध्ये किती फायदा झाला आहे हे त्या महिलेने ट्वीट करत सांगितले आहे. सध्या तिचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे ट्वीट अश्विनी देशपांडे या मराठमोळ्या महिलेचे आहे. ‘इजिप्तमधील एक ट्रॅव्हल एजंटला पैसे ट्रान्सफर करायचे होते. पण ट्रान्सफर करण्यासाठी अनेक समस्या येत होत्या. तेव्हा तो एजंट म्हणाला, तू शाहरुख खानच्या देशातील आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझे बुकिंग घेतो. तू मला नंतर पैसे दे. मी सहसा असे काही करत नाही पण शाहरुखने आमच्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे शाहरुखसाठी काहीही’ या आशयाचे ट्वीट त्या महिलेने केले आहे.
सध्या या महिलेने केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. शाहरुखचे चाहते हे ट्वीट रिट्विट करत त्याची प्रशंसा करताना दिसत आहेत. अनेकांनी शाहरुखचा अभिमान वाटतो असे देखील म्हटले आहे. शाहरुख हा २०१८मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर शाहरुखने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला. आता लवकरच तो ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.