Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदाच “विंटेज कार रॅली आणि प्रदर्शन”

महापालिकेकडून मतदान जनजागृतीसाठी अभियान

पिंपरी | पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात पहिल्यांदाच “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन नेहरूनगर, पिंपरी येथील एच.ए. मैदानावर केले असून ऐतिहासिक व दुर्मिळ कार आणि बाईक प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा असे,आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात वतीने “भव्य विंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विंटेज कार आणि बाईक रॅलीची सुरुवात सायंकाळी ५ वाजता कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथून होणार आहे. नाशिक रोड मार्गे भारतरत्न जे.आर.डी.टाटा उड्डाणपूल येथून जुना मुंबई पुणे हायवेद्वारे वल्लभ नगर मार्गे संत तुकारामनगर येथे एच.ए. मैदान याठिकाणी रॅली विसर्जित होऊन प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा     –        जयंत पाटील राजकारणातील नारदमुनी, पवारांच्या घरफोडीतील मोरक्या: सुरज चव्हाण

महापालिकेच्या वतीने शहरात विविध माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबाविण्यात येत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा प्राथमिक उद्देश लोकांना लोकशाहीच्या या निवडणूकरुपी महाउत्सवात सहभागी करून घेऊन मतदानाचे प्रमाण वाढविणे हा आहे. महापालिका शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, नवमतदार यांच्यासह समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत आहे. नागरिकांना लोकशाहीतील त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देऊन निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी या “भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले असल्याचे खोराटे यांनी सांगितले.

या भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली प्रदर्शनात विविध फियाट मॉडेल्स सह विविध कंपन्यांचे दुर्मिळ कार पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार असून यामध्ये फियाट बलीला १९३५, फियाट मिलीसिंटो १९५५, फियाट सिलेक्ट १९६०, फियाट सुपर सिलेक्ट १९६२, फियाट प्रेसिडेंट १९७५, फियाट प्रीमियर पद्मिनी १९८०, ११८ एनइ आदी बहुसंख्य ऐतिहासिक दुर्मिळ कार व बाईक्स पाहण्याची संधी नागरिकांना महापालिकेने उपलब्ध करून दिली असून नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्यने भेट द्यावी, असे आवाहन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button