राज्यात ऑक्सिजन वाहतुकीसाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुबंई – राज्यात ऑक्सिजन वाहतुकीसाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ऑक्सिजन इतर राज्यातून येण्यासाठी उशिर होत आहे. विशाखापट्टणमहून रेल्वे येत आहे पण उशिर झाला आहे. त्यामुळे ज्या राज्यातून ऑक्सिजन मिळेल तिथे रिकामे टँकर्स एअरलिफ्ट केले जाणार आहेत. एअरफोर्सच्या माध्यमातून रिकामे टँकर्स पाठवले जाणार आहे. यामुळं ऑक्सिजन मिळण्यात गती प्राप्त होईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
आज पंतप्रधान मोदी यांनी ज्या राज्यात कोरोना रुग्ण जास्त आहे त्या राज्यांशी चर्चा केली आहे. 9 ते 10 मुख्यमंत्री या कॉन्फरन्सला होते. या बैठकीनंतर राजेश टोपे म्हणाले की, ऑक्सिजन देताना आपली संख्या 7 लाख आहे त्यात 10 टक्के क्रिटिकल होतात. ऑक्सिजन, रेमडेसीवीर आणि लस न्याय हक्कानं मिळाली पाहिजे आपल्या संख्येनुसार मिळाली पाहिजे, असे मुद्दे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसमोर मांडले असल्याचं टोपेंनी सांगितलं आहे.
फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये हवेतील नायट्रोजन शोषून ऑक्सिजन सोडतात, अशा इंडस्ट्री असतील तोच प्लांट वापरता येईल. तर, आपल्या राज्यासाठी सिलेंडर कमी पडले त्यामूळं 10-12 हजार सिलेंडर मागवले आहेत. साखर कारखान्याबाबत शरद पवारांनी सूचना दिल्या आहेत. जमेल त्या मार्गाने कशी उपलब्धता वाढवता येईल त्यावर विचार करत आहोत, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सांगितलं, ऑक्सिजन संदर्भात ऑक्सिजन ऑडिट करा. रेमडेसिवीरचं ब्लॅक मार्केटिंग थांबवा, तेव्हा राज्यानं ते करावं आम्ही ते एकत्र येऊन एकजुटीने काम करू, असंही टोपे म्हणाले.