राज्यभरात धरणे आंदोलन करून बस डेपोत पाळला बंद
एसटी विलीनीकऱणाच्या मागणीसाठी संप पुकारला त्यांनीच घेतली माघार
महाराष्ट्र : ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन करून अनेक बस डेपोमध्ये बंद पाळला गेला. तर दुसरीकडे राज्यसरकार आणि एसटी संघटनेची बैठक निष्फळ ठरली. त्यात महाविकास आघाडी सरकार असताना वकील गुणरत्न सदावर्ते, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी एसटी विलीनीकऱणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. तेच आता विलीनीकऱण शक्य नसल्याचे म्हणताय. विविध १० ते १५ एसटी संघटनांनी धरणे देत अनेक डेपोत बंद पाळला.
राज्यसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्ता, घरभाडं मिळावं आणि एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार वेतन वाढ मिळावी. ही प्रमुख मागणी एसटी आंदोलकांची आहे. तर या मागणीकरता ३५ एसटी डेपोमध्ये पूर्ण बंद पाळला गेला. इतर डेपोमध्ये अंशतः बंद पाळण्यात आला. तर ठाणे विभागात कल्याण, विठ्ठलवाडी येथे एसटी बंद होती. तर मराठवाड्यात लातूर, नांदेड विभागात एसटी बंदला पाठिंबा मिळाला. यासह इतर विभागातही बंद पाळला गेला.





