‘RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

RCB Victory Rally : आरसीबी संघाने आयपीएल 2025 जिंकले आहे आणि त्यानंतर बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सन्मान केला जात आहे. मात्र, या सन्मानादरम्यान असे काही घडले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
प्रत्यक्षात, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत 20 जण गंभीर जखमीही झाले आहेत. तर 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.
हेही वाचा – राज्यात १० शहरांमध्ये ESIC रुग्णालयांची उभारणी; अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळाची मंजुरी
चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आरसीबीच्या विजयी परेडमध्ये सहभागी असलेल्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.