Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

Narendra Modi Post : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या उत्साहावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं सावट दिसून येत आहे. दहिसर येथे गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या झाल्याने राज्यात या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाबरोबरच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या साऱ्या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची फारशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसत नाही.

हेही वाचा – चॉकलेट डे का साजरा करतात? या दिवसाचे महत्त्व काय? वाचा सविस्तर..

मुख्यमंत्र्यांना टॅग करुन पोस्ट

“महाराष्ट्राचे डायनॅमिक आणि इंडेस्ट्रीयस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!” असं म्हणत मोदींनी त्यांच्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांना टॅग करुन पोस्ट केली आहे. “अगदी तळागाळातील लोकांशी असलेल्या संवादामुळे त्यांनी आपल्या कामाची आणि कष्टाळू स्वभावाची छाप सोडली आहे. राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी ते काम करत आहेत, त्यांच्या दिर्घ आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button