Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुडाळच्या राजकीय रिंगणात सोमनाथ कदमांची ‘एन्ट्री’; प्रस्थापितांचे धाबे दणाणले!

मोठमोठ्या पक्षांना तेच तेच चेहरे का सुचतात? युवकांचा सवाल; 'अदृश्य शक्ती'च्या चर्चेने कुडाळ गणात राजकीय वातावरण तापले

सातारा | प्रतिनिधी

जावली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कुडाळ पंचायत समिती गण (क्र. ७३) मध्ये आज एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळाले आहेत. प्रस्थापित पक्षांच्या ‘घराणेशाही’ आणि ‘तेच तेच चेहरे’ देण्याच्या वृत्तीला छेद देत, युवकांचे खंबीर समर्थक आणि कुडाळचे उपसरपंच सोमनाथ लक्ष्मण कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे. त्यांच्या या अनपेक्षित एन्ट्रीमुळे तालुक्यातील राजकीय गणिते पूर्णपणे विस्कळीत झाली असून, प्रस्थापितांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

युवा नेतृत्वाचा एल्गार

​”मोठमोठ्या राजकीय पक्षांना प्रत्येक वेळेस तेच तेच नेते का सुचतात? दुसऱ्यांना संधी कधी मिळणार?” असा संतप्त सवाल सध्या कुडाळमधील तरुण मतदारांमधून विचारला जात आहे. याच भावनेला वाट करून देण्यासाठी सोमनाथ कदम यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. आज मोजक्या पण कट्टर समर्थकांसह त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला.

हेही वाचा      :        पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६: स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारीला १२ नंतर बंद 

अदृश्य शक्ती’ची पंचक्रोशीत चर्चा

​सोमनाथ कदम यांनी कोणत्याही मोठ्या पक्षाची वाट न पाहता ज्या धडाक्यात उमेदवारी अर्ज भरला, त्यावरून कुडाळ पंचक्रोशीत एकाच चर्चेला उधाण आले आहे. कदम यांच्या मागे अशी कोणती ‘अदृश्य शक्ती’ उभी आहे, ज्याच्या बळावर त्यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे? या प्रश्नाने राजकीय विश्लेषकांची झोप उडवली आहे.

विकासाच्या मुद्द्यावर ठाम

​अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सोमनाथ कदम म्हणाले, “कुडाळ गणातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणे, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. जनतेच्या आग्रहाखातर आणि भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी हा निर्णय घेतला आहे.”

प्रस्थापितांना युवकांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. नेहमी तेच चेहरे समोर ठेवून जनतेवर लादले जातात. सोमनाथ दादांसारखा सर्वसामान्यांत मिसळणारा आणि कामाचा अनुभव असलेला तरुण नेता रिंगणात उतरल्यामुळे आता खऱ्या अर्थाने बदलाची लाट येईल. आम्ही सर्व युवक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

– महेश कदम, युवा समर्थक. 

हे परिवर्तनाचे पाऊल आहे. सोमनाथ कदम यांनी उपसरपंच म्हणून गावात उत्तम काम केले आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क हीच त्यांची मोठी शक्ती आहे. कुडाळ गणाच्या विकासासाठी एका नवीन विचाराच्या नेतृत्वाची गरज होती, ती आता पूर्ण होईल. ही निवडणूक चुरशीची ठरेल यात शंका नाही.

– संदीप पवार, राजकीय विश्लेषक/कार्यकर्ते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button