ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचा संजोग वाघेरेंना जाहीर पाठिंबा
पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यासोबत शिरीष घरत यांची भेट घेत पाठिंब्याचे दिले पत्र
![Self-respecting Youth Republican Party publicly supports Sanjog Waghere](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/संजोग-वाघेरे-780x470.jpg)
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघ व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
महेश साळुंखे यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यासोबत शिरीष घरत यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले. शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.