Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

‘माझ्या शिक्षणाची आणि माझ्या क्रिकेटची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज नावाने झाली’; सचिन तेंडुलकर

मुंबई : माझ्या शिक्षणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली, अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली.

मुंबई भाजपा अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी जाणता राजा प्रयोगाचे आयोजन केले आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर या महानाट्याचे प्रयोग आयोजित केला होता. या वेळी सचिन तेंडूलकर, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेत्री सना शिंदे, कँबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली आरती करून प्रयोगांच्या मालिकेला सुरूवात झाली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर आदींनी हजेरी लावली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button