“सीमाप्रश्नाच्या ठरावावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजिबात आक्रमक नव्हते”; रोहित पवार

अधिवेशनाचा एक आठवडा वाढवावा रोहित पवार यांची मागणी
नागपूर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल आपल्या सीमाभागातील ठराव मांडत होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव जर आपण बघितले तर ते अजिबात आक्रमक नव्हते. हा विषय हसण्याचा मजेचा नव्हाता. हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय होता. त्यामध्ये अनेक मुद्दे घ्यायला हवे होते ते घेतले नाहीत. आक्रमकता दाखवली गेली नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या हिताचे अनेक विषय आम्हाला मांडायचे आहेत. ते मांडायची संधी आम्हाला गेल्या आणि या आठवड्यात मिळालेली नाही. त्यामुळे अधिवेशनाचा एक आठवडा वाढवावा असं आमचं मत आहे. पण कदाचित हे सरकार असं करेल असं वाटत नाही. कारण आज महाविकास आघीडच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या विषयावर पुन्हा घोषण्या दिल्याने ते दिवस वाढवतील असं वाटत नाही, असं राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
सोबतच, कर्जत-जामखेड मतदारसंघातील तहसिलदार आणि प्रांत अधिकारी यांचे निलंबन केल्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. याच अधिकाऱ्यांनी गेल्या २ वर्षात चांगलं काम केलं. लाखो लोकांना मदतही त्यांच्यामुळेच मिळाली. केवळ मला अडचणीत आणण्यासाठी हा निर्णय घाईघाईने घेतला असून तो चुकीचा आहे, असं रोहित पवार म्हणाले.





