अकरावी प्रवेशासाठी पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारल्यास दुसऱ्या यादीतही प्रवेश मिळणार नाही
![Rejection of first choice college for 11th admission will not get admission in second list also](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/11th-admission-780x470.jpg)
11th Admission List 2023 : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. या यादीत पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे. पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश नाकारल्यास विद्यार्थ्यांना दुसऱया गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी दिली जाणार नसून या एका फेरीपुरते विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीतून बाद केले जाणार आहे.
त्यानंतर तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. मुंबई एमएमआर विभागात अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या यंदा एकूण २ लाख ३६ हजार ५९१ जागा उपलब्ध आहेत. तर ऑनलाईन प्रवेश फेरीसाठी २ लाख २३ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीक्रम भरले आहेत.
हेही वाचा – राज्यात ‘या’ दिवशी मान्सून सक्रिय होणार? हवामान विभागाची माहिती
पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी २१ जून सकाळी १० ते २४ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे नंतर जाहीर केले जाणार आहे. कोटय़ातील प्रवेश कॉलेजस्तरावर सुरू आहेत.