Weather Update : रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याला आज रेड अलर्ट
![Red alert for Raigad, Ratnagiri, Satara and Pune today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/rain-maharashtra-1-780x470.jpg)
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून येत्या २८ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याला आज रेड अलर्ट दिला आहे.
राज्यात पुढील ७२ तासात मान्सून अतिसक्रिय असेल. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच पुणे-सातारामधील घाटमाथ्यावर बुधवारी आणि गुरूवारी दोन्ही दिवस रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामानशास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी या भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा – रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याला आज रेड अलर्ट
#RainUpdatepराज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा जिल्हयांसाठी रेड अलर्ट.@IMDWeather @DDNewslive @DDNewsHindi#rainalert pic.twitter.com/gbNoDc3yDy
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 26, 2023
पालघर, ठाण्यासह मुंबईतही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकेल. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथे काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे तर दरडी आणि इमारती कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत.