Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यावर दुहेरी संकट! शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी

Maharashtra Weather | हवामान विभागाने राज्यातील हवामानासंदर्भात एक महत्वाची अपडेट दिली आहे. राज्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अशातच आता हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
राज्यात थंडीचा कडाका पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशांहून खाली आला आहे. मात्र आगामी दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी, ११ जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, ११ ते १५ जानेवारीपर्यंत पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे, तर त्यानंतर १८ जानेवारीपासून पुन्हा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.





