Monsoon Update : पुढील २४ तासांत राज्यात पावसाचा अलर्ट
![Rain alert in the state in the next 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Rain-780x470.jpg)
पुणे : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.
पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं आता चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. देशालाही या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत काही राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – Gitanjali Aiyar : दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/image-22.png)
कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, पालघर या भागात २४ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर वादळी वाऱ्यामुळे पाऊस आणखी लांबण्याची शक्यता आहे.