Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अलर्ट

पुणे : राज्यातील पावसाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या ७२ तासांत संपुर्ण राज्यात मान्सून पोहोचणार आहे. तसेच आज देखील राज्यातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

चक्रीवादळानंतर आता मान्सून सक्रिय होण्यासाठी पुरक वातावरण तयार झाले आहे. मान्सून संपूर्ण राज्यात येत्या ७२ तासांत पोहचणार आहे. तसेच पुढील पाच दिवसांसाठी राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पावसापासून वाचण्याचे साहित्य सोबत बाळगा असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – टाटांच्या TCS मध्ये १०० कोटींचा नोकरी घोटाळा, ४ अधिकारी निलंबित

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1672159337475883009

पुण्यात २५ आणि २६ जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पुण्यात अंदाजे १०० मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ २०.७ मिमी पाऊस झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button