Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुणेकरांनो सावधान! दुपारी ११ ते ३ वाजेदरम्यान बाहेर जाणे टाळा!

पुणे : राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने कहर केला आहे तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे. पुणे जिल्ह्यात कमालीचे तमापना वाढण्याची शक्यता आहे. रविवारी म्हणजे आज पारा ४१ अंशाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.

भारतीय हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना उष्माघातापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. लोकांना शक्य तितके हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सकाळी ११ ते ३ वाजेदरम्यान बाहेर जाणे टाळावे, असं म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत’; संजय राऊत यांचा हल्लाबोल

दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मगरपट्टा, लवळे, कोरेगाव या सर्व ठिकाणी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लोणावळा जिल्ह्यात ३४.५ कमाल तापमानाची नोंद झाली असून इतर सर्व भागांमध्ये ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button