breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली, राजेंद्र भोसले नवे आयुक्त

पुणे | पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज बदली करण्यात आली आहे. राजेंद्र भोसले आता नवीन आयुक्त असणार आहेत. तशा प्रकारचे आदेश शासनातर्फे जारी करण्यात आले आहे.

विक्रम कुमार यांनी नुकतेच ११ हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यामध्ये पुणे शहरात असलेल्या विविध मोठमोठ्या प्रकल्पांचा गवगवा करण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना, समाविष्ट गावांचा विकास, अशा विविध प्रकल्पांना गती देण्यात आली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली.

हेही वाचा    –    ‘एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार’; असीम सरोंदेंचा मोठा दावा

निवडणुकीची आचारसंहिता लागणार म्हटल्यावर कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. पुणे महापालिकेत मागील २ वर्षांपासून विक्रम कुमार प्रशासक म्हणून काम पाहत होते. महापालिका निवडणूक न झाल्याने आयुक्तांनी पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button