Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

पुणे शहराला नवीन 1000 ई-बसेस मिळणार: प्रस्तावाला वेग, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची अवजड उद्योगमंत्र्यांशी चर्चा

पुणे :  शहरासाठी आवश्यक असणाऱ्या १००० ई-बसेसच्या विषयासंदर्भात आज सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. १००० बसेसच्या मागणीसंदर्भातील पीएमपीएमएलकडून अपेक्षित असणारा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे दाखल झाला असून याबाबत पुढील प्रक्रिया वेगाने करण्यासंदर्भात कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने एकीकडे मेट्रो मार्गांचा आपण विस्तारत करत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरण हादेखील आपला प्रमुख अजेंडा आहे. या दृष्टीने या बसेससाठी आवश्यक असणारे पत्र राज्य सरकारने रिझर्व बँकेला प्रस्ताव पाठवावा, याबाबत नुकतीच मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती.

हेही वाचा –  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंचे स्वबळाचे संकेत…

या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव रिझर्व बँकेला राज्य सरकारकडून पाठवण्यात आले असून या प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून पीएमपीएमएलकडून अधिकृत प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.

पुणे शहराला १००० बसेस मिळण्याच्या दृष्टीने असणाऱ्या प्रक्रियेला आता गती आली असून ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने करण्याचा प्रयत्न आहे. या चर्चेवेळी कुमारस्वामी यांनी आपल्या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत पुढील प्रक्रियेसंदर्भात सूचित केले असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button