Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्‍तव्य केल्‍याप्रकरणी तसेच इतिहास अभ्‍यासक इंद्रजित सावंत यांना फाेनवरून धमकी दिल्‍या प्रकरणी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आले. आज झालेल्‍या सुनावणीत कोर्टाने प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्‍यान कोरटकर याचे वकील कोल्हापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्‍याची माहिती समाेर येत आहे.

कोरटकरला न्यायालयात हजर करणार असल्‍याने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील दोन्ही वेळा प्रशांत कोरटकर याच्यावर हल्‍ल्‍याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे आजही पोलिसांनी न्यायालया बाहेर मोठा बंदोबस्त ठेवला होता. पुन्हा त्‍याच्यावर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न होउ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.

प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्‍तव्य केले होते. इतिहास अभ्‍यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. यानंतर तो फरार झाला होता. त्‍यामुळे पोलिस त्‍याच्या मागावर होते. अखेर महिनाभरानंतर पोलिसांनी कोरटकरच्या मुसक्‍या आवळल्‍या होत्‍या. त्‍याला काेर्टासमाेर सादर करण्यात आले आहे. दरम्‍यान त्‍याला फरार काळात काेणत्‍या लाेकांनी मदत केली याचा पाेलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा –  श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास, भाविकांची बाप्पाचं दर्शन घेण्यास अलोट गर्दी

न्यायालयात येऊन जामीन ठेवण्यासाठी कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी काही वेळांचा अवधी मागितला आहे. परंतु अद्याप काही जणांची चौकशी करायची असल्याने कोरटकर याची न्यायालय कोठडी देण्याची पोलिसांनी मागणी केली आहे.

कोरटकर याचे वकील सौरभ घाग काही वेळात कोल्हापूर न्यायालयात येणार असून, सौरभ घाग यांना जामीनासाठी म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने काही वेळांचा अवधी दिला आहे. कोरटकर याचे वकील सौरभ घाग कोल्हापूर न्यायालयात आल्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडी की जामीन याच्यावरती सुनावणी होईल. त्यामुळे अर्ध्या तासात प्रशांत कोरटकर याची रवानगी न्यायालयीन कोठीत होते की जामीन मिळतो हे स्पष्ट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button