Pimpri-Chinchwad : गंहुजेनंतर आता मोशीत होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
![International cricket stadium to be built in Moshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Moshi-international-cricket-stadium-780x470.jpg)
पिंपरी : क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या स्टेडियमसाठी सुमारे चारशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र. १/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे.
२०२३-२४ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी चारशे कोटी रूपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी सल्लागार नेमण्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले आहे.
हेही वाचा – विकेट गेलेला माणूस विकेट गेली कसं सांगतो? शरद पवारांचा फडणवीसांना टोला
https://twitter.com/maheshklandge/status/1673935755843096576
पुण्यात पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम तर गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम आहे. दरम्यान, गहुंजे येथील स्टेडियमवर यंदा एकदिवसीय वर्ल्ड कपचे ५ सामने खेळले जाणार आहेत. तर याच धर्तीवर मोशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे नियोजन आहे. मोशीत क्रिकेट स्टेडियम झाल्यास पुणे जिल्ह्यात तीन स्टेडियम होतील.