ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ओणम व शिक्षक दिन उत्साहात

संस्कृती आणि संस्कारांचा संगम–विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेचे बीज

पिंपरी-चिंचवड: मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये केरळचा प्रसिद्ध सण ओणम आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विविध संस्कृतींची जाणीव निर्माण व्हावी आणि प्रत्येक परंपरेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

ओणमच्या निमित्ताने शाळेत पारंपरिक फुलांची रांगोळी (पुक्कलम) साकारण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी रंगीत पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य व गीतांच्या माध्यमातून केरळ संस्कृतीचे दर्शन घडवले. या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरली ती पारंपरिक “ओणसद्य” — म्हणजेच केळीच्या पानावर वाढलेली पारंपरिक केरळी मेजवानी. ही भव्य मेजवानी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

या कार्यक्रमानंतर लगेचच शिक्षक दिनाचाही उत्सव पार पडला. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा दिवस, विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा केला.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास कार्यक्रम सादर केले — यात कविता, नृत्य, नाटिका, आणि गायनाचा समावेश होता. या सादरीकरणातून त्यांनी शिक्षकांप्रती आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या डॉ. नायर यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान करत त्यांना स्मृतिचिन्हे व भेटवस्तू प्रदान केल्या. ओणम आणि शिक्षक दिन यांचे हे संयुक्त आयोजन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांची शिकवण देणारे ठरले. मास्टर माईंड ग्लोबल स्कूलने पुन्हा एकदा शिक्षण आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाफ घडवत एक आदर्श उभारला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव…

मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने ओणम आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने केवळ सण साजरे न करता विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतील एकता, परंपरांचा सन्मान आणि गुरुजनांविषयी आदरभाव यांची बीजे रोवली. विविध राज्यांतील सण एकत्र साजरे करून शाळेने “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला चालना दिली. शिक्षक दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व पटवून देत, त्यांच्या मार्गदर्शनामुळे घडणाऱ्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अशा उपक्रमांद्वारे विद्यालय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, परंपरांचे पालन आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीची जाणीव निर्माण करत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button