गणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुढच्या वर्षी लवकर या..! डिजे आणि ढोल-ताशांच्या गजरात एक्झर्बिया अबोडच्या लाडक्या बाप्पाला निरोप

मोठ्या उत्साहात येथील रहिवाशांनी विसर्जन मिरवणूकीत सहभाग नोंदविला

डिजे आणि ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (२८ सप्टेंबर) महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. वडगांव मावळातील जांभुळगाव येथील एक्झर्बिया अबोड सोसायटीमधील गणेश मंडळाने मोठ्या उत्साहात गेले १० दिवस गणेशोत्सव साजरा केला. गेले १० दिवस गणेशोत्सव मोठ्या ज्ल्लोषात साजरा करण्यात आला. १० दिवस गणरायाची मनोभावे सेवा करून गणेशभक्तांनी गुरुवारी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (२८ सप्टेंबर) लाडक्या गणपती बाप्पाला टाकवे येथील इंद्रायणी नदी घाटावर निरोप दिला. येथील रहिवाशांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तर ढोल-ताशांच्या निनादात आणि डीजेच्या तालावर नाचून लहान थोर, महिला-पुरुष मंडळींनी गणपती बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत मोठ्या उत्साहात येथील रहिवाशांनी विसर्जन मिरवणूकीत सहभाग नोंदविला.

मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनील पवार, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, दीपक पाटील, सुमीत पुरी, कृष्णा लोखंडे, मनोज गायकवाड, दिनेश सकट, शैलेश घाग, योगेश हुळे, गणेश क्षिरसागर, सार्थक कुंभार, सार्थक क्षिरसागर, धनंजय वाणी, सतीश कदम, सागर म्हाळकर, प्रकाश कांबळे, राजेश सोळंकी, जितेंद्र पाल, भूपेंद्र पाल, मोहन प्रक्षाळे यांनी तसेच महिलांमध्ये अनिता हिंगे, मनिषा कुंभार, काजल पुरी, माधुरी सकट यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवादरम्यान 10 दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धकांना गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विजेत्यांना पारितोषिव व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
एक्झर्बिया गणेशोत्सव मंडळाने या वर्षी एक अनोखा पायंडा पाडला. सोसायटीमधील मुस्लिम समाजाच्या रहिवाशांच्या हस्ते गणेश आरतीचे, तसेच बक्षिस वितरणाचे आयोजन केले. यावेळी सोहेल शेख कुटुंबियांच्या वतीने गणेशोत्सवामध्ये सहभाग नोंदवून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ पवार यांनी पुढाकार घेतला.

ज्येष्ठांचाही उचित सन्मान
सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून गणेश मंडळाने सामाजिक सलोखा जोपासला. यावेळी ज्येष्ठांनी देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. व पुढील वर्षी ज्येष्ठांसाठी देखील काही स्पर्धांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाप्रसादाने सुखावली रहिवाशांची मने
यावर्षी मिरवणुकीनंतर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील रहिवांशांनी उत्स्फूर्तपणे महाप्रसादाचा लाभ घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button