ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमधील मालवाहतूकदार काढणार मोर्चा, रिक्षाचालकही पाळणार बंद

मालवाहतूकदारांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा

नाशिक : मालवाहतूकदारांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ट्रक ठप्प राहणार असून, शहरातील टेम्पो सेवाही बंद ठेवली जाणार आहे.

आडगाव ट्रक टर्मिनल येथून इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावा, तेथे वाहनतळ व सारथी सुविधा केंद्र विकसित करावे, जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणून विकसित करावेत, टेम्पो स्टॅण्डसाठी कायमस्वरूपी जागा द्यावी, राज्यातील चेक पोस्ट बंद करावेत आदी मागण्यांसाठी गुरुवारी (दि. ४) सकाळी १० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात सुमारे दोन हजार ट्रकचालक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील दोन हजार ट्रक बंद राहणार आहेत. हा इशारा मोर्चा असून, मागण्या मान्य न झाल्यास शहरातून ट्रक मोर्चा काढला जाईल. रात्रंदिवस प्रवासात असणाऱ्या ट्रकचालकांना शौचालयासारख्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे येत्या पाच-सहा वर्षांत चालकांची कमतरता निर्माण होण्याची भीती असल्याचेही फड म्हणाले.
पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी; मुंडे समर्थकांकडून ५ हजार नारळ फोडून नवस पूर्ण

दरम्यान, पत्रकार परिषदेला ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी, श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक, प्रवासी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे, मोटार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष पी. सी. चढ्ढा, रिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर सय्यद, मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अंजू सिंगल, मोटार मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव उपस्थित होते. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

श्वान सोडले जात असल्याचा आरोप

ट्रक टर्मिनलजवळच्या केंद्रात निर्बीजीकरणासाठी आणलेले श्वान तेथेच सोडून दिले जात असल्याचा आरोप चढ्ढा यांनी केला. तेथे दोन-तीन मृत श्वान पडलेले असून, अशा अस्वच्छ परिसरात ट्रकचालकांना स्वयंपाक व जेवण करावे लागत असल्याचेही ते म्हणाले.
मी विधानसभेला उभा राहणार नाही; लोकसभेच्या पराभवानंतर जानकरांनी निर्णय जाहीर केला

रिक्षाचालकही पाळणार बंद

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षांना योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी विलंब शुल्क म्हणून रोज पन्नास रुपये दंड आकारला जात असून, त्याविरोधात रिक्षाचालक येत्या आठवड्यात बंद पाळणार असल्याची माहिती भगवंत पाठक यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button