Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपुरातील भीषण स्फोट निष्काळजीपणामुळेच; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाखांची मदत, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Chandrashekhar Bawankule : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे काल (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये आतापर्यंत 19 कामगार मृत्युमुखी पडले असून 23 जण जखमी आहे. जखमींपैकी 13 जण गंभीररित्या जखमी असून ते 70% पेक्षा जास्त भाजले आहेत. आज बैठकीत निर्णय झाले की पेसोचे अधिकारी, डिशचे अधिकारी आणि कामगार आयुक्त या विभागांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या सर्वांनी गेल्या वर्षभरात करावे तसे काम केले नाही. विभागीय आयुक्त आणि पोलिस अधीक्षक त्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई शिफारस करतील. त्यानंतर या अधिकाऱ्यांवर ( पेसो, डिश, कामगार विभाग) गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. सोबतच, घटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आलं आहे. अशी महत्वपूर्ण माहिती भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

Nagpur SBL Company Blast : कंपनी कडून 75 लाख, राज्य सरकारकडून 5 लाख, तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत

दरम्यान, केंद्र सरकारकडे ही या संदर्भात रिपोर्ट पाठवले जाईल. पीयूष गोयल यांच्याशी बोलले गेले आहे. पीयूष गोयल ने गेल्या काही काळात झालेल्या स्फोटांची माहिती मागितली आहे. जोवर SBL कंपनी बंद राहील, तोवर कामगारांना पगार दिले जाईल. कंपनी पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांच्या स्किल डेव्हलपमंट बद्दल प्रशिक्षण दिले जाईल. SBL कंपनीमध्ये काही कामगारांचे मुळीच प्रशिक्षण झाले नव्हते.

हेही वाचा –  जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

मृतांच्या वारसांना कंपनी कडून 75 लाख रुपये, राज्य सरकार कडून 5 लाख, तर केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये असे एकूण 82 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. तर जखमींना 25 लाख रुपये दिले जाईल. जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल. अशी माहितीही भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

दरम्यान, घटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात अंतिम रिपोर्ट येईल. जे-जे दोषी आढळतील, सर्वांवर कारवाई होईल. आज संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेहांची DNA चाचणी आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. त्यांनतर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. जर अधिकारी दोषी असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई का करू नये? असा सवालही  चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button