पिंपरी विधानसभा क्षेत्रातून ४ हजार पेक्षा जास्त सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाणार
सुचनांची पेटी (बॉक्स) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त
पिंपरी : नुकतेच पिंपरी विधानसभेतील कार्यकर्ते व पिंपरी विधानसभेचे प्रमुख अमित गोरखे यांच्या संपर्क अभियानातून निगडी पासून दापोडी पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यास कुठल्या प्रकारच्या केंद्रीय योजना पिंपरी विधानसभेत हव्या आहेत याची विचारणा नागरिकांकडे केली गेली. तसेच नागरिकांकडून याबाबतच्या सूचना लेखी स्वरूपात घेण्यात आल्या. तब्बल चार हजार रुपये अधिक सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती अमित गोरखे यांनी दिली.
आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर पिंपरी विधानसभेतील विकासकामासाठी अमित गोरखे यांच्या पुढाकाराने नागरिकांकडून सुचना गोळा करण्यात आल्या. त्या सुचनांची पेटी (बॉक्स) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी अमित गोरखे यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी आमदार बाळा भेगडे, प्रशांत ठाकुर, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, अनुप मोरे, बाळासाहेब पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.





