Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील विधानभवन परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

मुंबई : आमदार आणि नागरिकांची वर्दळ असणाऱ्या विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास अचानक विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. विधानभवन हा परिसरात कायमच गजबजलेला असतो. येथे नेत्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी असते.

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही कोणतीच दुखापत झाली नाही. पण यामुळे विधानभवनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, विधानभवनाच्या सुरक्षेसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो, मात्र अचानक घडलेल्या आगीच्या घटनेमुळे विधानभवनाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर विधानभवनाच्या रिसेप्शन एरियात जी स्कॅनिंग मशीन असते त्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.

हेही वाचा – राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी विधानभवन परिसरात आमदार आणि खासदार उपस्थित होते. एका कार्यक्रमानंतर ते भोजनासाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीने रिकामा करण्यात आला असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पाहणी केली असून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फायर एक्टिंग्युशन यांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे. विधानभवनाच्या रिसेप्शन एरियामध्ये जी स्कॅनिंग मशिन असते, त्यात शॉर्ट सर्किट झाल्याने ही छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशन दलाच्या गाड्या येत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आगीच्या दुर्घटनेत सर्व कर्मचारी सुरक्षित असून कर्मचारी लागलीच बाहेर आले होते. त्यामुळे, कुठलीही दुर्घटना घडली नसल्याचंही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button