TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

माडगूळकरांचे स्मारक एका वर्षात करा, चंद्रकांत पाटील यांचा महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम

पुणे ः पुणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे. त्यासाठी येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिल्या.

पालकमंत्री पाटील यांनी माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून स्मारकाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त (विशेष) आयुक्त विकास ढाकणे, अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे उपस्थित होते. पाटील म्हणाले, गदिमा स्मारकाच्या मूळ इमारतीचे काम आधी पूर्ण करावे. प्रदर्शन केंद्रावर सुरू असलेल्या कामांसोबतच स्मारकाचे कामही पुढच्या वर्षी गुढीपाडव्यापर्यंत हाती घेऊन पूर्ण करावे. या कामासाठी चांगली क्षमता असलेला कंत्राटदार नेमण्यात यावा. काम पूर्ण करण्यासाठी त्याला प्रोत्साहनपर सुविधा द्याव्यात. स्मारकाच्या अंतर्गत आराखड्याचा आराखडा गदिमांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून पुढील आठवड्यात सादर करावा. गदिमांच्या कार्याशी सुसंगत स्मारक करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी ढाकणे यांनी स्मारकाच्या कामाची माहिती दिली. कोथरूड येथे तीन मजली भव्य स्मारक बांधण्यात येणार असून बांधकाम क्षेत्रफळ 3 हजार 230.78 चौरस मीटर असेल. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच स्वतंत्र सभागृहे आणि दुसऱ्या मजल्यावर प्रायोजित थिएटरसाठी एक थिएटर करण्याचे नियोजन आहे. प्रदर्शन केंद्राच्या स्वतंत्र इमारतीचे क्षेत्रफळ 8 हजार 580.32 चौरस मीटर असून त्याचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button