Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गुंतवणूक आकर्षणात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आंध्र प्रदेश अव्वल

मुंबई : प्रदीर्घ काळ देशातील आणि परदेशातील गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र आता राज्यातील स्पर्धा वाढत चालल्यामुळे परिस्थिती बदलत आहे. प्राप्त माहितीनुसार 2025 मध्ये एकूण गुंतवणुकीपैकी आंध्र प्रदेशात 25.3% गुंतवणूक झाली आहे व हे राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. दुसर्‍या क्रमांकावरील ओरिसा राज्यात एकूण गुंतवणुकीपैकी 13.1% गुंतवणूक झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र या क्षेत्रात आघाडीवर होता. आता महाराष्ट्रात एकूण गुंतवणुकीपैकी केवळ 12.8% गुंतवणूक होऊन महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आला आहे.

चौथ्या क्रमांकावरील तेलंगणामध्ये 9.5%, पाचव्या क्रमांकावरील गुजरात मध्ये 7.1%, सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडूत 4.9%, सातव्या क्रमांकावरील राजस्थानमध्ये 4.3% गुंतवणूक झाली आहे. छत्तीसगड राज्यात 3.9%, मध्य प्रदेशात 3.2 %, उत्तर प्रदेशात 2.7 %, पश्चिम बंगालमध्ये 2.6%, कर्नाटकमध्ये 2.1%, आसाममध्ये 0.9% व झारखंडमध्ये 0.9% इतकी गुंतवणूक झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

हेही वाचा –  स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ

तामिळनाडूत आतापर्यंत बरीच गुंतवणूक होत होती. मात्र यावर्षी तामिळनाडूमध्ये केवळ 4.9% गुंतवणूक झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश सरकारने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी बर्‍याच योजना आणि मेळावे आयोजित केले होते. मात्र तरीही भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या केवळ 2.7 टक्के इतकी झाली आहे. त्या उलट ओरीसा, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल, छत्तीसगडसारख्या तुलनेने मागासलेल्या राज्यांनी गुंतवणूक आकर्षित करण्यात यश मिळविले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button