Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
Pune : LPG सिलिंडरचा स्फोट, दुकान जळून खाक, २ जण जखमी

पुणे : आज (सोमवारी) सकाळी पहाटे पुण्यातील एका दुकानात एसपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की दुकानाचे छत उडाले आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-सातारा रोडवरील डी मार्ट शॉपिंग सेंटरजवळ हा अपघात झाला आहे. अग्निशमन दलाच्या ७ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यानंतर रस्त्यावर पसरलेला ढिगारा साफ करण्यात आला.
घरगुती उपकरणे, स्वयंपारघरातील वस्तू आणि मोबईल फोन विकणाऱ्या दुकानात आग लागल्याने हा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. स्फोट एवढा जोरदार होता की, दुकानाचे शटर व भिंती खाली पडल्या आहेत. दुकानातील सामान १०० फूट अंतरावर रस्त्यावर पडले आहे. या आगीत एक दुचाकीही जळून खाक झाली आहे.






