नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारू दुकाने पहाटेपर्यंत सुरू

मुंबई : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारू दुकाने २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी उशिरापर्यंत सुरू ठेवता येतील आणि नव्या वर्षी पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यपींना चिअर्स करता येणार आहे. बीअर बार आणि परमिट रूप यांना पहाटे पाच वाजेपर्यंत आणि काही इतर काही श्रेणीतील दुकानांना रात्री एक पर्यंत उघडे ठेवण्याची अनुमती राज्य सराकराने दिली आहे.
दारूची दुकाने रात्री १०.३० ते दुसर्या दिवशी पहाटे एक पर्यंत उघडे ठेवता येतील. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आणि हद्दीबाहेरील दारूची दुकानेही रात्री ११.३० ते दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत उघडे ठेवता येणार आहेत. देशी दारूची विक्री करणार्या सीएल-३ ही अनुज्ञप्ती असणारी दुकाने महापालिका तसेच अ, ब वर्ग पालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री ११ ते दुसर्या दिवशी पहाटे १ पर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसर्या दिवशी पहाटे १ पर्यंत उघडे ठेवता येतील.
हेही वाचा – कोरोना वाढतोय, मास्क वापरा! देशात २४ तासात ५९४ नवे रूग्ण, ६ मृत्यू
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण ३१ डिसेंबर रोजी मद्यपान करतात आणि नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्यासाठी पार्टी करतात. या काळात मद्याची मागणी असते. मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होतो. मद्य विक्रीमुळे राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे या वेळ वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक फायदा होणार आहे.





