breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीदेश-विदेश

कोरोना वाढतोय, मास्क वापरा! देशात २४ तासात ५९४ नवे रूग्ण, ६ मृत्यू

Covid-19 JN.1 Variant : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. देशात गेल्या २४ तासात ५९४ नवे रूग्णांची नोंद झाली आहे. तर ६ मृत्यू झाले आहेत. मागच्या दोन आठवड्यात कोरोनामुळे २२ मृत्यू झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार एक्टिव झाले आहेत.

देशासह राज्यातही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या १०० हून अधिक कोरोना रूग्ण आहेत. यामध्ये नव्या JN1 व्हेरियंटच्या रूग्णांचाही समावेश आहे. मुंबईतही १९ कोरोना रूग्ण आढळले आहेत, मात्र यातील एकही JN1 व्हेरियंटचा रूग्ण नाही.

हेही वाचा  –  मोठी बातमी! राज्यातील लोकसभेच्या २३ जागांवर ठाकरे गटाचा दावा 

केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्राकडून राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. रुग्णालयाची तयारी, देखरेख आणि मॉक ड्रिलसह तयार राहण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

नव्या वेरिएंटच काय लक्षण?

कोविडचा नवीन वेरिएंट JN.1 मध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, गळ्यात त्रास आणि ताप येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button