Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

बेपत्ता झालेले केदार जाधवचे वडील अखेर मुंढव्यात सापडले

पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करून घेतला महादेव जाधव यांचा शोध

पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव सोमवारी कोथरूड परिसरातून बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबविली. कोथरुड, एरंडवणे भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. अखेर सोमवारी रात्री केदार जाधवचे वडील मुंढवा भागात सापडले आहेत.

केदार जाधव याचे कुटुंबीय कोथरूड परिसरात वास्तव्याला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, केदार जाधव याचे वडील महादेव जाधव कोथरूड भागातून सोमवारी (२७ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले. मात्र, सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवण्यात आला. कोथरूड, एरंवडणे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच या परिसरातील रिक्षा थांबे आणि रिक्षाचालकांकडून माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले. पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करून जाधव यांचा शोध घेतला. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास केदारचे वडील मुंढवा भागात सापडले, असं अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button