Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त विधान

पुणे : कालिचरण महाराज हे त्यांच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. पुणे जिल्ह्यातील भौरमध्ये बोलताना त्यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे आहेत, असं विधान आयोध्याचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर आता कालिपुत्र कालिचरण महाराज यांनी सुद्धा याला दुजोरा दिला आहे. राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत, त्यांनी टीव्हीवर सांगितलं आहे. २० वर्षांनंतर जेव्हां आमची संख्या जास्त होईल तेंव्हा राममंदिर आम्ही पुन्हा फोडून टाकू..जी भीती महंतांनी व्यक्त केली ती खरी आहे, असं कालिचरण महाराज म्हणाले.

हेही वाचा  –  ‘भुजबळांकडे पेढे खायला, प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार’; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार व्हावं. सर्व हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्रित व्हावं. हिंदुराष्ट्र व्हावं हीच प्रार्थना आहे, असंही कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. राममंदिराच्या उद्घाटनावर बोलताना अयोध्या तो झाकी है और काशी मथुरा बाकी है, असं कालिचरण महाराज म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस नेते प्रियंक खर्गे यांनी सावकरांबाबत केलेल्या विधानाचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. आम्हाला सावरकर पाहिजेत, ज्यांना नकोयत त्यांनी काढण्याचा प्रयत्न करा आम्ही लावण्याचा प्रयत्न करू..लोकांच्या डोक्यात आम्ही सावरकर टाकण्याचा प्रयत्न करू, असं कालीचरण महाराज म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button