“शिक्षक भरती घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी”; अनिल देशमुख

नागपूर : शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस तुकड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस तुकड्यांना मंजुरी दिली आहे. त्या आधारावर बॅक डेटमध्ये बोगस शिक्षक भरती केल्यासंदर्भात हे आरोप होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
अनिल देशमुख म्हणाले, शिक्षक भरती घोटाळा फक्त नागपूर जिल्हा पुरता मर्यादित नसून राज्यात अनेक ठिकाणी हा घोटाळा झाला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघातही हा घोटाळा झाला आहे. २०१५ पासून नव्या तुकड्यांना मान्यता देण्यात येऊ नये असे असताना,
हेही वाचा – सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळात देशी वृक्षलागवडीचा उपक्रम; आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी बैठक
दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये बॅक डेटमध्ये तुकड्यांना मान्यता देऊन शंभर शिक्षकांची बॅक डेटमध्ये नेमणूक केली आहे. एक एक शिक्षक दोन शाळेत नोकरीवर दिसून येत आहे. अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
शिक्षण मंत्रांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस तुकड्यांना नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन बोगस शिक्षक भरती होत असेल, तर राज्यभरातील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे असे देशमुख म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक घोटाळा संदर्भात एसआयटीची निर्मिती करण्यात आली असून ती एसआयटी सध्या चौकशी करत आहे. मात्र राज्यसाठीची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत करावी अशी मागणी आहे.