Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

तेव्हा आम्ही एकत्र…. अजितदादांचं राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर विधान

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळी चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी हे एकत्रिकरण व्हायला हवं, असं उघडपणे बोलून दाखवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आता याच चर्चेवर थेट भाष्य केलंय. कुटुंब म्हणून सुख-दुखा:च्या काळात आम्ही एकत्र येतोच, असं त्यांनी म्हटलंय.

अजित पवार यांनी पत्रकारांना वेगवेगोळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच वेळी भविष्यात अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र येतील का? असे अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर बोलताना अजितदादांनी थेट उत्तर दिलं. माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच, विचारधारा वेगवेगळी आहे. पण कुटुंब म्हणून सुख दुखा:त आपण एकमेकांसोबत असतोच, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – “शिक्षक भरती घोटाळ्याची न्‍यायालयीन चौकशी व्‍हावी”; अनिल देशमुख

गेल्या काही दिवसांत अजित पवार आणि शरद पवार हे अनेकवेळा एकत्र आलेले आहे. वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे तसेच इतर बैठकांत शरद पवार आणि अजित पवार आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे, पवार घराण्यातीलच आमदार रोहित पवार यांनी थेटपणे एकत्रिकरण व्हायला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटातील नेते छगन भुजबळ यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मला आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली होती.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना या एकत्रिकरणाबाबत विचारलं होतं. त्यांनी मात्र मला काहीही माहिती नाही, असं उत्तर दिलं होतं. आता अजित पवार यांनीही कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही एकत्र येतोच, असं भाष्य केलंय. सध्या अजित पवार यांनी आमच्या विचारधारा एक आहेत, असं म्हटलं असली तरी आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button