Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ITI Admission 2023 : आयटीआय प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरू होणार..

ITI Admission 2023 : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेस सोमवार म्हणजेच १२ जून २०२३ पासून सुरूवात होणार आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे अनेक टप्पे इ. प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दररोज आयोजित करण्यात येणार ल आहे.

इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधी व प्रमाणित कार्यपद्धतीची माहितीपुस्तिकाही ऑनलाईन स्वरूपात या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा – Snehal Rai : अभिनेत्री स्नेहल रायच्या कारचा पुण्याच्या दिशेने जाताना अपघात

याशिवाय माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर, प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button