IPL 2006: सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी अभिषेक शर्माचा विचार! झालं असं की..

IPL 2006 : आयपीएल 2026 स्पर्धेचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक समोर आलं आहे. असं असताना फ्रेंचायझीमध्ये ऐनवेळी काही उलथापालथी होताना दिसत आहे. असं असताना अभिषेक शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा पडण्याची शक्यता आहे. कारण की…
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू होणार आहे. या सामन्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबाद मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची माळ अभिषेक शर्माच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक शर्माकडे पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची सूत्र असतील. पॅट कमिन्स संघात परतल्यानंतर त्याच्याकडे सूत्र जातील.
हेही वाचा – उन्हाळ्यातही भाज्या जास्त काळ ताज्या राहतील, ‘या’ टिप्स ठरतील अत्यंत उपयोगी
पॅट कमिन्स सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याला पाठदुखीचा त्रास होत आहे. एशेज कसोटी मालिकेत हा त्रास अधिक जाणवू लागला. त्यामुळे 3 कसोटीही खेळू शकला नाही. त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मुकला.
पॅट कमिन्स पूर्णपणे बरा झालेला नाही आणि वैद्यकीय टीमकडून मंजुरी मिळाल्यानंतरच मैदानात परतेल. त्यामुळे 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अभिषेक शर्माकडे जबाबदारी असेल
अभिषेक शर्माला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये त्याची वाढती प्रतिष्ठा आणि लोकप्रियता. अभिषेक शर्माला आता आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बराच अनुभव आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व करण्यास तयार आहे





