आयपीएलचे आता ४K मध्ये प्रसारण होणार

मुंबई : आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. लवकरच आयपीएलच्या हंगामाला सुरूवात होणार आहे. आता बीसीसीआयने आपल्या टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी चांगली सुविधा निर्माण करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने जियोच्या नेतृत्वातील स्पोर्ट्स १८ ला ४K व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आयपीएल २०२३ चे प्रसारण करण्याची परवानगी दिली आहे.
4K व्हिडीओ फॉरमॅट हा HD १०८०p व्हिडीओ पेक्षा चांगल्या दर्जाचे असतात. यामुळे चांहत्यांना आयपीएलचा एक वेगळा आणि उच्च दर्जाचा अनुभव घेता येणार आहे. जियो ४K रिजॉल्यूशन सुविधा देणार आहे. याबातची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
यापुर्वी फिफा वर्ल्डकपमध्ये ४K सुविधा दिल्याचा दावा केला आहे. मात्र एका वरिष्ट मीडिया स्टॅटेजिस्टने सांगितले की, फिफा हा जियोसाठी एक शिकण्याचा प्रकल्प होता. त्यांनी गेल्या दोन महिन्यात आपल्या तांत्रिक क्षमतेत वध्दी करण्यासाठी काम केले. आता ते आयपीएलदरम्यान उच्च गुणवत्तेचा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे.
आयपीएल २०२३ भारतात १६ ते १७ भाषांमध्ये लाईव्ह स्ट्रीम होणार आहे. यात बंगाली, तमीळ, तेलगू आणि ओडिसा या भाषांचा देखील समावेश आहे. यामुळे भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांना भाषेची कोणती तक्रार राहणार नाही.





