Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

IND vs ENG : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील सामने मोफत लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या

IND vs ENG Test Series 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच, भारतीय चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटचा उत्साह संचारणार आहे. आता सामन्यांना फार वेळ बाकी नाही, त्यामुळे तुम्हीही सामना लाईव्ह पाहण्याची तयारी करून ठेवा. सामने इंग्लंडमध्ये होणार असल्याने प्रत्येकासाठी तिथे जाऊन सामना पाहणे शक्य नाही. पण काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही घरबसल्या मोफत कसे सामना पाहू शकता.

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, जी आता सुरू होऊन ऑगस्टपर्यंत चालेल. हे सामने तुम्ही तुमच्या टीव्हीवर लाईव्ह पाहू इच्छित असाल, तर त्यासाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहावे लागेल. तिथे अनेक चॅनेल्सवर तुम्हाला सामने पाहता येतील. सोनीने यावेळी थेट प्रक्षेपणासाठी काही खास व्यवस्था केली आहे, ज्यामुळे तुम्हाला विशेष अनुभव मिळेल. पण जर तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपवर सामने पाहण्यास इच्छुक असाल, तर त्यासाठी तुम्हाला जियो हॉटस्टारवर जावे लागेल. तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये जियो हॉटस्टार ॲप असल्यास तुम्ही सामने पाहू शकता.

हेही वाचा –  भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही

जर तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असेल, तर तुम्ही टीव्हीवर जिओ हॉटस्टार ॲप डाउनलोड करून सामना पाहू शकता. पण या सगळ्या त्रासापासून मुक्ती हवी असेल, तर सर्वात सोपा मार्ग आहे डीडी स्पोर्ट्स चॅनल. डीडी स्पोर्ट्सवर भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. मात्र, यासाठी तुमच्याकडे फ्री डिश कनेक्शन असणे आवश्यक आहे. फ्री डिश नसेल, तर तुम्ही सामना पाहू शकणार नाही. म्हणजेच, डीडी स्पोर्ट्सवर मोफत सामना पाहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक :

पहिली कसोटी: २० ते २४ जून २०२५, हेडिंग्ले, लीड्स (सुरूवात: दुपारी ३:३० वाजता)

दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै २०२५, एजबेस्टन, बर्मिंगहॅम (सुरूवात: दुपारी ३:३० वाजता)

तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै २०२५, लॉर्ड्स, लंडन (सुरूवात: दुपारी ३:३० वाजता)

चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै २०२५, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर (सुरूवात: दुपारी ३:३० वाजता)

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५, द ओव्हल, लंडन (सुरूवात: दुपारी ३:३० वाजता)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button