सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली । महाईन्यूज ।
दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयजीएलने सीएनजीच्या दरात प्रति किलो 3 रुपयांची वाढ केली आहे. तसेच, पीएनजीच्या दरातही 3 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
सीएनजी आणि पीएनजीच्या नव्या दरांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 75.61 रुपयांवरून 78.61 रुपये झाली आहे. तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये किंमत 78.17 रुपयांवरून 81.17 रुपये करण्यात आली आहे.
गुरुग्राममध्ये सीएनजीची किंमत 86.94 रुपये, रेवारीमध्ये 89.07 रुपये, कर्नालमध्ये 87.27 रुपये, मुझफ्फरनगरमध्ये 85.84 रुपये आणि कानपूरमध्ये 89.81 रुपये झाली आहे. किमतीत वाढ झाल्यामुळे ओला-उबेर सारख्या टॅक्सी सेवा देखील जास्त प्रवासी भाडे आकारण्याची शरक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सध्या सर्व बाजूंनी महागाई वाढत असल्याने दिवाळीपर्यंत सर्वसामन्यांना दिलासा नाहीच.
सीएनजीसह पीएनजीच्या किंमतीही वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये त्याची किंमत 53.59 प्रति मानक घन मीटरवर गेली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये किंमत 53.46 वर गेली आहे. मुझफ्फरनगर, शामली आणि मेरठमध्ये किंमत प्रति मानक घनमीटर 56.97 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, अजमेर, पाली, राजसमंदमध्ये दर 59.23 वर गेला आहे. तर कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूरमध्ये या किमती 56.10 पर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. अशा स्थितीत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून आधीच वर्तवला जात होता. आता या दिशेने सीएनजीच्या दरात किलोमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे.
मुंबईतही सीएनजीच्या दरात वाढ
सीएनजीच्या दरात किलोमागे 8 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा स्थितीत लोकांना या महागाईतून दिलासा मिळत नाही. दुसरीकडे, पीटीआयच्या अहवालात कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजच्या हवाल्याने म्हटले आहे की, जुन्या गॅस फील्डमधून तयार होणाऱ्या गॅसच्या किमती एका वर्षात सुमारे 5 पटीने वाढल्या आहेत.