औरंगाबादमध्ये तरूणाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाचा अर्धा भाग जाळला
औरंगाबाद | प्रतिनिधी
औरंगाबादमध्ये एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. औरंगाबादच्या टीव्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या मैदानात हा प्रकार घडला आहे. हत्या एवढी भीषण होती की मारेकऱ्यांनी हत्येनंतर कंबरेच्या खाली मृतदेह जाळण्यातही आला आहे. सिद्धार्थ साळवे असं हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.
शॉपिंग कॉम्प्लेक्समागील मैदानात मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस श्वान पथकासह या ठिकाणी पोहचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सिद्धार्थ साळवे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. या तरूणाला आधी दगडाने ठेचून संपवण्यात आलं त्यानंतर त्याचा मृतदेह अर्धवट जाळण्यात आला. याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत असून मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठीही पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू केला आहे. अधिक माहिती तपासानंतर दिली जाईल असंही सांगितलं आहे.
आठवड्याभरातली औरंगाबादमधली ही दुसरी घटना आहे. ही हत्या एकापेक्षा जास्त लोकांनी केली असण्याची शक्यता आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. याआधीही एका तरूणाची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती.





