‘लाडकी बहीण’ योजनेत महत्वाचे अपडेट, प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष, तीन शिफ्टमध्ये काम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-70-780x470.jpg)
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. योजनेसाठी अॅप तयार केल्या गेल्यावर आता वेबसाईट सुरु झाली आहे. प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष तयार केले गेले आहे. अर्जांच्या छननीसाठी तीन शिफ्टमध्ये कामे सुरु आहेत. तांत्रिक पडताळणी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात एक रुपया टाकला जात आहे. हा एक रुपया केवळ पडताळणी आहे, तो सन्मान निधी नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आता तालुका स्तरावर शिबिरे घेतली जात आहे. त्यात पात्र महिलांचे अर्ज भरले जात आहेत. पालकमंत्री या योजनेवर लक्ष ठेऊन आहेत. योजनेसाठी आलेल्या सर्व अर्जांची छाननी तालुकास्तरावरच केली जात आहे. त्यासाठी तालुक्यात छाननी कक्ष तयार केला आहे. त्या छननी कक्षात तीन शिफ्टमध्ये कामे सुरु केली आहे. तसेच ऑनलाईन दाखल झालेल्या अर्जांवर तालुकानिहाय मंजुरीची प्रक्रिया सुरु आहे. योजनेसाठी ऑफलाईन आलेल्या अर्ज ऑनलाईन केले जात आहे.
हेही वाचा – चिखलीतील बेकायदा पार्कींगमुळे सर्वसामान्य नागरिकांना मन:स्ताप!
लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत’ हे अॅप यापूर्वीच सुरु झाले होते. त्यानंतर आता १ ऑगस्ट २०२४ पासून वेबसाईट सुरु केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. महिलांना आपले अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळ (पोर्टल) दाखल करता येणार आहे. दोनच दिवसांत वेबसाईटवरुन 25 हजार जणांचे अर्ज आले आहे.