Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
ठाण्याच्या भाईंना इकडचे दादा भारी पडतील, एकनाथ शिंदेंना खासदार संजय राऊतांचा अलिबागमधून इशारा

रायगड : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलिबाग येथे शिवसैनिकांना संबोधित केलं. राज्यातील सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करणं सुरु ठेवलं आहे. आज अलिबागमध्ये संजय राऊत यांनी कुणीतरी माझा उल्लेख अलिबागचा पुत्र असा केलाय, असं म्हटलं. दि.बा. पाटील हे मोठे नेते होते, बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. आपल्याला या सभेनंतर कार्यक्रम करायचा आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना आपल्याला तसं करायचंय. शिवसैनिक जागेवर आहेत, आमदार वॉकरवर गुवाहाटीला चालतात, असा टोला संजय राऊत यांनी महेंद्र दळवींना लगावला. मी महेंद्र दळवींना फोन केला तर त्यांनी आराम करतोय सांगितलं, असा राऊत म्हणाले.





