Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”, राणे कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया

मुंबई |

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा केल्याने अडचणी वाढल्या असून अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे, नाशिक आणि महाडमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेचे आदेश दिले असून एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे.

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला आहेत. या सर्व घडामोडींवर राणे कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. नारायण राणेंचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. “कुठेतरी बॅनर लावा आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यांनी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ,” असं निलेश राणे म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button