Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर..’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : गुरुवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला, या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काही जणांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो, त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप मिळणारच’ हिंदुत्वासाठी कोणी काम करत असेल तर ते बाळासाहेबांच्या मुलाला खटकणारच, म्हणूनच तर त्यांनी बाळासाहेब यांचा विचार सोडला असं आम्ही बोलतो, असं राणे यांनी म्हटलं आहे.

काही जणांना आम्ही जिहादी हृदयसम्राट म्हणतो, त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप मिळणारच’ हिंदुत्वासाठी कोणी काम करत असेल तर ते बाळासाहेबांच्या मुलाला खटकणारच, म्हणूनच तर त्यांनी बाळासाहेब यांचा विचार सोडला असं आम्ही बोलतो.  स्वतःचा मुलगा कसा आहे, हे त्यांना माहिती आहे.  त्यामुळे मला पेंग्विन बोलून फरक पडत नाही.  स्वतःच्या मुलाची अवस्था बघा,  दिनो आणि दिशा बद्दल माहिती देत आहोत आम्ही, म्हणून टीका केली जाते.  स्वतःच्या मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर हे टाळता आलं असतं, असा घणाघात राणे यांनी केला आहे.

हेही वाचा –  निरंकारी मिशनच्या सेवादारांकडून पालखी मार्गाची स्वच्छता

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या बापाचं नाव लावायची लाज वाटायची. राहुल गांधी स्टेजवर असताना हिंदू हृदयसम्राट बोलण्याची हिंमत तरी करा, शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे   राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. हम दो हमारे दो एवढंच तुम्ही केलं, आम्ही विकास करतोय असं राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीसंदर्भात सूरू असलेल्या चर्चेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या हितासाठी ते भांडले नव्हते, त्यांचे कौटुंबीक भांडणं होती. लग्नामध्ये एकत्र येतात, तुम्हाला विचारून एकत्र येतात का? एकाकडे शून्य आमदार आणि एकीकडे 20 आमदार काय होणार? असा खोचक टोला यावेळी नितेश राणे यांनी लगावला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button