Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
उद्धव ठाकरे यांना ७५ हजार पत्र लिहिणार- आशिष शेलार
![I will write 75,000 letters to Uddhav Thackeray - Ashish Shelar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Shelar-and-CM-Uddhav-2.jpg)
मुंबई |
“उद्धव ठाकरे यांना ७५ हजार पत्र लिहिणार आहोत. हा देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. कृपया लक्षात ठेवा, असे पत्राचे स्वरुप असणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले. तसेच संयमी शरद पवार यांच्यासोबत राहूनही शिवसेनेचे हे संकुचित राजकारण आहे, अशी टीका देखील शेलार यांनी केली.
नारायण राणेंचा जो जामीन अर्ज निकाली निघाला तो अर्ज आधीच रद्द होणार असल्याचे अनिल परब सांगतात, याचा अर्थ मंत्र्यानी या सगळ्या प्रक्रियेत दलालांमार्फच हस्तक्षेप केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अनिल परब आणि सबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.