TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

पिंपरी: समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सत्कार सन्मान तसेच पुरस्कार वितरण सोहळा आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला .
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मोनिका सिक्का ( स्पर्श फाउंडेशन), हेमलता खळदे (माजी अध्यक्ष इनर व्हील क्लब), अडव्होकेट श्वेता सूर्यवंशी लाभल्या.

संस्थेच्या संस्थापिका राजश्री गागरे म्हणाल्या, नेहमी समाजातील कर्तुत्वान महिलांच्य साठी असेच कार्यक्रम राबवत राहणार असून, ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहे. सुमारे १ हजार २०० पेक्षा जास्त लघुउद्योजिका संस्थेत असून, भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी नेहमी कार्यशील राहील.
यावेळी सामाजिक क्षेत्र- सुनीताताई कुरकुटे शैक्षणिक क्षेत्र -शुभांगी घुंडरे, क्रीडा क्षेत्र -प्रीती म्हस्के
अभिनय क्षेत्र -कांचन पाटील, महिला सत्कार मूर्ती, आदर्श माता- रेखाताई महाजन वैद्यकीय क्षेत्र -डॉक्टर मनीषा सोनवणे, शैक्षणिक क्षेत्र -अनुष्का कवडे, महिला रिक्षा चालक -कामिनी पवार इत्यादींचा सत्कार झाला.
कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मनीषा थोरात (एक्सप्रेस मीडिया), रीना मोहारे (लोकमत सखी मंच समन्वयिका), श्रद्धा ताई लांडगे( सामाजिक कार्यकर्ता), पौर्णिमा लुनावत (सामाजिक कार्यकर्ता), सुजाता लोंढे ,स्नेहल दराडे, रेशु अग्रवाल, सीमा तनवर, मंजू कैरा प्रीती भांबुर्डेकर, उषा धुमाळे, डॉक्टर क्षमा धुमाळ इत्यादींची लाभली.
यावेळी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी कर्तृत्ववान महिलांचा तसेच पारंपारिक फॅशन शो आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. मीनाताई आखाडे आणि कुणाल वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button